Atpadi Crime : आटपाडीत चांदीचे 28 लाखांचे दागिने जप्त

आटपाडी ःयेथील पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने मंदिरातील चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी आणलेल्या चार आरोपींना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून 28 लाख 22 हजार 500 रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

29 एप्रिल 2026 रोजी पोलिस हवालदार दादासाहेब ठोंबरे यांना मिळालेल्या माहितीनुसार दिघंची परिसरात काही संशयित चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या झडतीदरम्यान चांदीचा कलश, मुकुट, पंचमुखी नाग व महादेव पिंडीवरील पत्रा असे एकूण 11 किलो 900 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत 28 लाख 22 हजार 500 रुपये आहे. चौकशीत हा मुद्देमाल कडेगाव तालुक्यातील खेराडे (विटा) येथील महादेव मंदिरातून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लक्ष्मण अण्णा चौगुले (29), गुंडू यंकाप्पा जेडपे (30), परशुराम तिमण्णा इटकर (34) तसेच एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.(सर्व रा. बजरंगनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथील रहिवासी आहेत.



from pudharinews https://ift.tt/QnRjFfC
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url