Pudhari Icon Awards | ‘पुढारी‌’मुळे चांगल्या कार्याला नवी ऊर्जा : निपुण कोरे

कोल्हापूर : समाजाच्या विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणार्‍या व्यक्तींच्या कार्याची दखल ‘पुढारी’सारख्या सामाजिक भान असलेल्या वृत्त समूहाने घेतल्यामुळे समाजात सकारात्मकता निर्माण होते. अशा गौरव सोहळ्यांमुळे काम करणार्‍यांना अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन वारणा सहकारी बँकेचे चेअरमन निपुण कोरे यांनी मंगळवारी (दि. 28) केले.

दै. ‘पुढारी’ व प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘पुढारी आयकॉन’ पुरस्कार सोहळ्यात शहरांतील कर्तबगार व्यक्तींचा गौरव निपुण कोरे यांच्या हस्ते हॉटेल न्यू पॅव्हेलियन येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव उपस्थित होते. दैनिक ‘पुढारी’ नेहमीच समाजातील चांगल्या कामांना बळ देण्याचे काम करत आहे. समाजात काम करत असताना कोणीतरी आपल्या कामाची दखल घ्यावी, असे प्रत्येकाला वाटत असते. ‘पुढारी’च्या वतीने समाजाला नवी ऊर्जा देणारे काम असेच सुरू राहावे, यासाठी ‘पुढारी’ला माझ्या शुभेच्छा, असेही कोरे म्हणाले.

विजय जाधव म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात विविध आवृत्त्या, ‘पुढारी’न्यूज चॅनेल, टोमॅटो एफएम आणि डिजिटल या माध्यमांतून ‘पुढारी’ महाराष्ट्राच्या मातीशी जोडला गेला आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच समाजातील सकारात्मक काम करणार्‍या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम ‘पुढारी’ सातत्याने करत आहे.

या सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. राहुल पाटील (आर्थराईटिस आणि रुमेटोलॉजी सेंटर), डॉ. नुपूर पाटील (डर्मा लॅब क्लिनिक), डॉ. कुणाल पाटील (संजीवनी रुमॅटोलॉजी क्लिनिक), डॉ. शैलेंद्र माने (श्री व्यंकटेश्वरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल), डॉ. बसवराज कडलगे (अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल), स्वप्निल आय केअर सेंटर, डॉ. गीता पिलाई (जानकी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल), डॉ. महावीर पाटील (वर्धमान ऑर्थो केअर) तसेच रूपाली व डॉ. अमोल बावडेकर (बावडेकर आयुर्वेदिक) यांचा गौरव करण्यात आला. तसेच व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अरुण सोनवणे (अधिराज इन्फ्रा प्रोजेक्टस्), धीरज जैन (ड्रीम व्हिजन हॉस्पिटॅलिटी आणि क्लब), ए. एच. मोतीवाला (शुभरत्न केंद्र, निपाणी) आणि नंदिनी खुपेरकर (गगन टूर्स) यांनाही ‘पुढारी आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘पुढारी’चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार यांनी आभार मानले. टोमॅटो एफएमचे आरजे झाहीद यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विभागीय व्यवस्थापक (स्पेशल इनिशिएटिव्ह) बाळासाहेब नागरगोजे, जाहिरात व्यवस्थापक जावेद शेख, सिनिअर इव्हेंट व्यवस्थापक राहुल शिंगणापूरकर आणि सहायक जाहिरात व्यवस्थापक रिया भांदिगरे आदी उपस्थित होते.

हा सन्मान जबाबदारी वाढवणारा

80 वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या ‘पुढारी’ समूहाकडून गौरव होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे डॉ. गीता पिलाई यांनी सांगितले. यामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली असून, भविष्यात आणखी चांगले काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ए. एच. मोतीवाला यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘वडिलांच्या आजारपणाच्या काळात ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा मोठा आधार मिळाला.’ ‘पुढारी’शी असलेले हे नाते कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे असल्याचे विजेत्यांनी नमूद केले.



from pudharinews https://ift.tt/2CcXpI0
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url