Gas Cylinder | आता दहा मिनिटांत मिळवा गॅस सिलिंडर!

नवी दिल्ली : भारतातील क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली असून त्याअंतर्गत क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर भारतातील पहिली ऑन डिमांड एलपीजी सिलिंडर वितरण सेवा सुरू करण्यात आली आहे.

आता घरगुती वापरातील अत्यंत अत्यावश्यक असलेल्या एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी ग्राहकांना इन्स्टामार्टद्वारे घरबसल्या केव‍ळ दहा मिनिटांत मिळेल. या सेवेसोबतच, एचपीसीएलच्या नव्या पिढीतील दहा किलो वजनाचा कंपोझिट एलपीजी सिलिंडर ‘HP Navya’देखील इन्स्टामार्टवर उपलब्ध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या सेवेसाठी तुमच्याकडे नियमित गॅस कनेक्शन असण्याची गरज नाही.

ही सेवा कशी काम करणार?

ऑर्डर प्रक्रिया : ग्राहक नेहमीप्रमाणे इन्स्टामार्ट ॲपवर लॉग इन करून दहा किलो किंवा पाच किलोचा सिलिंडर निवडून ऑर्डर करू शकतात.

नवीन ग्राहक : पहिल्यांदा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सर्व कायदेशीर प्रक्रिया (ओळख पडताळणी) पूर्ण केल्यानंतर नवीन सिलिंडर दिला जाईल.

रिफिलिंग : त्यानंतर, पुढील वेळेस रिफिल सिलिंडर मागवताना ग्राहकांना फक्त वितरकाला आपला रिकामा सिलिंडर परत करावा लागेल आणि नवीन गॅस भरलेला सिलिंडर मिळेल.

सुरक्षा आणि नियम : सर्व ऑर्डर्स एचपीसीएलच्या अधिकृत वितरक नेटवर्कद्वारेच पूर्ण केल्या जातील. कंपनीचे प्रशिक्षित कर्मचारी लागू असलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करून ‘प्रूफ-ऑफ-डिलिव्हरी’ दस्तऐवजीकरणासह सिलिंडर पोहोचवतील.



from pudharinews https://ift.tt/pjG46uq
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url