Sangli municipal officer assault: महापालिका अधिकाऱ्यास महिलेकडून मारहाण

सांगली : भटकी कुत्री पकडण्याची कारवाई करण्याकरिता गेलेल्या महापालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यास एका महिलेने मारहाण केली. याप्रकरणी मयुरी मिलिंद देशपांडे (रा. कोरे आर्केड, विश्रामबाग, सांगली) यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वच्छता अधिकारी व पशुवैद्यकीय विभाग प्रमुख अतुल वसंत आठवले (रा. जोशी गल्ली, गावभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

महापालिकेच्या आपले सरकार पोर्टलवरील नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्याची जबाबदारी फिर्यादी अतुल आठवले यांच्याकडे आहे. तक्रारदार सौदामिनी पाटील यांनी विश्रामबाग येथील कोरे आर्केड येथे राहणाऱ्या मयुरी देशपांडे यांनी विनापरवाना भटकी कुत्री पाळली असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे भटकी कुत्री पकडण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास उपायुक्त स्मृती पाटील, सहायक आयुक्त सचिन सागावकर, आदींसह महापालिकेच्या स्वच्छता आणि डॉग व्हॅन विभागातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी गेले होते. त्यावेळी चौकशीत देशपांडे यांनी एकच श्वान मी पाळलेला असून बाकीचे माझे नाहीत, असे सांगितले.

अधिकारी त्यांच्याशी बोलत असताना देशपांडे यांनी फिर्यादी आठवले यांना खाली पाडून मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



from pudharinews https://ift.tt/3TJmG56
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url