Monsoon Update : जोरदार मान्सूनसाठी जूनचा तिसरा आठवडा उजाडणार

आशिष देशमुख

पुणे : जोरदार पावसासाठी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जूनमध्ये पावसाचे दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ जून यादरम्यान हलका ते मध्यम पाऊस राहील, तर दुसऱ्या टप्प्यात १९ ते २५ जून या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तो काळ पेरणीसाठी योग्य असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे.

यात पावसाचा पहिला टप्पा १२ ते १८ जून या सहा दिवसांचा असून, या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरात खूप कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मध्यम, तर मराठवाड्यात कमी पाऊस राहील, तर विदर्भात या टप्प्यात पाऊस नाही. मात्र, दुसरा टप्पा १९ ते २५ जून हा राज्यासह देशासाठी चांगला आहे.

हवामान खात्याचा अंदाज; विभागवार पर्जन्यमानाची टक्केवारी

पहिला टप्पा (१२ ते १८ जून) पर्जन्यमान (मि.मी.)...

कोकण : ६० % (मध्यम)

मध्य महाराष्ट्र : ४५ % (साधारण)

मराठवाडा : २३.% (अल्प)

विदर्भ :२६ % (अत्यल्प, रेड झोनमध्ये)

दुसरा टप्पा (दि. १९ ते २६ जून)

कोकण : ८० % (मुसळधार) : १८४

मध्य महाराष्ट्र : ६३.३ % (चांगला) : ७३ ते ७६

मराठवाडा : ४७ % (मध्यम) : ३१ ते ६१

विदर्भ : ६१.१ % (मध्यम) : २१ ते ७३.८

संपूर्ण भारत : +१८.३२% (दि. १९ ते २५ जून)

ईशान्य भारत : +३.१९ %

वायव्य भारत : -२०.६६%

मध्य भारत : +३३.४४ %

दक्षिण द्वीपकल्पीय भारत : +३१.%



from pudharinews https://ift.tt/3OCAv15
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url