Hantavirus cruise scare | हंता व्हायरस आढळेल्या क्रूझवर 2 भारतीय

अ‍ॅमस्टरडॅम/लंडन; वृत्तसंस्था : अटलांटिक महासागरातून युरोपकडे प्रवास करणार्‍या डच ध्वजधारी ‘एमव्ही होंडियस’ या आलिशान क्रूझ जहाजावर हंता व्हायरसचा संसर्ग पसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या जहाजावर दोन भारतीय नागरिकही प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून, आतापर्यंत पाच जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.

जहाज सध्या स्पेनच्या कॅनरी बेटांकडे जात असून 10 मेपर्यंत तेथे पोहोचण्याची शक्यता आहे. जहाजावरील सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या घटनेला गंभीर मानले असले, तरी सामान्य नागरिकांसाठी तातडीचा मोठा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा विषाणू कोरोनासारखा सहज आणि वेगाने माणसांमध्ये पसरत नाही. हंता व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्‍याकडे होणे तुलनेने कठीण आहे. त्यामुळे कोव्हिडसारखी व्यापक साथ पसरण्याची शक्यता कमी आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हंता व्हायरसचा इन्क्युबेशन पीरियड म्हणजे संसर्गानंतर लक्षणे दिसण्याचा कालावधी मोठा असतो. त्यामुळे संभाव्य संक्रमितांना तब्बल 40 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. या विषाणूचा इन्क्युबेशन कालावधी सहा आठवड्यांपर्यंत असू शकतो.

12 देशांना सर्तकतेचा इशारा

सेंट हेलेना येथे उतरलेल्या प्रवाशांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, सिंगापूरसह 12 देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संबंधित देशांमध्ये प्रवाशांचा शोध घेऊन वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



from pudharinews https://ift.tt/kvFuyaJ
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url