पहिला चहा : आदिचुंचनगिरी आणि किम गिरी

किम : (फोनवर) महामहीम आपण शांती समझुत्यात नवते का? ट्रम्प तुमच्याशीपण बॅटिंग खेळतोय. हाहाहाऽऽऽ

महामहीम : तुम्ही जरा शांत घ्या. तक्तुंबा नका खेळू. तुम्हाला खेळात कोणी घेणार नाही. नाकाबंदीमधे अवजड वाहनांची कसून चौकशी होते. त्यामुळे हार्मुझात कडमडू नका. गप्प बसा!

किम : पण, मी या युद्धात सगळ्यांना धूळ चारेन. फिटनेस गेला तेल लावत.

महामहीम : मी एका भाषणात आहे. नंतर बोलू. (फोन डिस्कनेक्टेड)

किम : शीटऽऽ मला भाषण तरी ऐकवायचं!

महामहीम : (मंदिराच्या उद्घाटन समारंभातील भाषणात) मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की, आपण या देशाचे रहिवासी जिथे अन्नधान्यातील विविधता आणि रुढी पाहायला मिळतात. मेक्सिकन बर्गर, पिझ्झा भारतात येऊन आहाराचे नेतृत्व करत आहेत, तरी आपण सर्वांनी या सर्वांना आजपासून दुय्यम आहार म्हणून पाहावे. लठ्ठपणा घालवायचा असेल, निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर मठाने जाहीर केलेल्या विकासाच्या नऊ तत्त्वांचे पालन अवश्य करा.

आज किमसारखी माजलेली मानसिकता लठ्ठपणाचे दुष्परिणाम विकृतीतून सांगतात. सुदैवाने किम भाऊ भारतात जन्मलेले नाहीत. नाही तर इथल्या मातीत त्यांना बाजरी कशी पिकवायची आणि मका कसा घ्यायचा, हे माती खाल्यानंतर नक्कीच समजलं असतं. उत्तर कोरियाची माती सुपीक नसल्याने माती खाऊनपण किमचं नापीक डोकं अजून पाताळयंत्रीच आहे. असो. आदीचुंचनगिरी मठाच्या देवमुनीनी रागी मुद्दे म्हणजे एक गोलाकार पदार्थ जो राजगिरा आणि बाजर्‍यापासून बनतो, त्याची लोकप्रियता वाढीस लागावी, यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ठरावीक आंतरराष्ट्रीय वाद लक्षात घेता हे स्फोटक बॉम्बचे नाव नसून ‘रागी मुद्दे’ हे पदार्थाचे नाव आहे आणि ते अत्यंत रुचकर आणि लठ्ठपणा कमी करणारे पौष्टिक खाद्य आहे. मी मठाचे कौतुक करतो. कारण, लठ्ठपणा कमी करण्यासाठी मठाच्या तत्त्वांनी अधिक सोपे केले आहे.

या मंदिराचे उद्घाटन करताना मला आनंदच होत आहे. मला वाटते या देशात सकस आहार उपलब्ध आहे. नाही तर किमसारखी पिडा भारतात पैदा झाली असती. लोकहो धन्यवाद! अशा देशाचे नेतृत्व आपण मला सोपवले.



from pudharinews https://ift.tt/VZoUlt7
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url