Gold Silver Price | सोने एक हजारने महागले; चांदीची 8 हजारांनी उसळी

जळगाव : सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगावमध्ये शुक्रवारी सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ झाली. यामुळे?अनेकांनी या दोन्ही धातूंची खरेदी तूर्त लांबणीवर टाकल्याचे दिसून येते.

जीएसटीसह सोन्याचा दर आता एक लाख 63 हजार 770 रुपयांवर पोहोचला. तसेच चांदीसाठी प्रति किलोमागे दोन लाख 81 हजार 190 रुपये मोजावे लागत आहेत. जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी 309 रुपयांची किरकोळ वाढ नोंदवली गेल्यानंतर 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम एक लाख 64 हजार 594 रुपयांपर्यंत पोहचले होते. गुरुवारी दिवसभरात 1133 रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम एक लाख 63 हजार 461 रुपयांपर्यंत खाली आले होते. शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा दरवाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम एक लाख 63 हजार 770 रुपयांपर्यंत वधारले.

चांदीच्या दराची काय स्थिती?

जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी 1030 रुपयांची वाढ झाल्यानंतर चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख 81 हजार 190 रुपयांपर्यंत पोहोचले होते. गुरुवारी दिवसभरात तब्बल 8240 रुपयांची घट नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख 72 हजार 950 रुपयांपर्यंत खाली आले होते.

शुक्रवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा तब्बल 8240 रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख 81 हजार 190 रुपयांपर्यंत वधारले. अफगाणिस्तान, पाकिस्तानमधील संघर्षामुळेही आशियाई बाजारपेठांवर दबाव निर्माण झाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर बाजारात घसरण झाली असून, गुंतवणूकदारांनी सोने-चांदीसारख्या पारंपरिक सुरक्षित पर्यायांकडे कल दर्शविला आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड प्रति औंस सुमारे 5187.39 डॉलरवर स्थिर राहिले. स्पॉट चांदीच्या दरात 0.6 टक्क्याची वाढ होऊन ती प्रति औंस 88.81 डॉलरपर्यंत पोहोचली.

सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा सोने-चांदीला पसंती

सराफ व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली तेजी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरलेली किंमत या कारणांमुळे ही दरवाढ झाली आहे. तसेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा सोने-चांदीकडे वाढल्याने बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे.



from pudharinews https://ift.tt/7y4SrtT
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url