Dubai Missile Attack : दुबईतील पाम जुमेराहमधील प्रसिद्ध हॉटेलवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुबईच्या पाम जुमेराह येथील फेअरमोंट हॉटेलवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये 'फेअरमोंट' या दुबईतील लोकप्रिय हॉटेलला मोठी आग लागली असून इमारतीचा मोठा भाग आगीच्या भक्षस्थानी आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून स्पष्ट दिसत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेत चार लोक जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.घटनेनंतर आपात्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले असून त्या परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तणावाच्या परिस्थितीमुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अल मकतूम विमानतळावरील विमान उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.



from pudharinews https://ift.tt/l9FMcz2
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url