Ravichandran Ashwin : अश्विनची तिसर्‍या कसोटीतून माघार

Ravichandran Ashwin

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजकोटमध्ये खेळत असलेला टीम इंडियातील फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने तिसर्‍या कसोटीतून अचानक माघार घेतली आहे. कुटुंबात मेडिकल इमर्जन्सी आल्याने तो तातडीने चेन्नईला परतला आहे. त्यामुळे तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या कसोटीतील उर्वरित तीन दिवस खेळू शकणार नाही. बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडून आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कठीण काळात बीसीसीआय अश्विनच्या पूर्णपणे पाठीशी आहे. बीसीसीआयसाठी खेळाडू आणि त्यांच्या परिवारातील लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.

अश्विन तातडीने कसोटी सोडून घरी परतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे; कारण कसोटी सामना महत्त्वाच्या टप्प्यावर आला असताना भारतील संघाला अश्विनची उणीव भासेल. त्याच्या जागी आलेला बदली खेळाडू क्षेत्ररक्षण करू शकेल; परंतु गोलंदाजी आणि फलंदाजी करू शकणार नाही. शुक्रवारी अश्विनने आपल्या कारकिर्दीतील 500 वी विकेट टिपली होती. (Ravichandran Ashwin)

The post Ravichandran Ashwin : अश्विनची तिसर्‍या कसोटीतून माघार appeared first on पुढारी.



from पुढारी https://ift.tt/z16BDXk
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url