तिरुपती बालाजी प्रमाणे सौंदत्ती येथील रेणुका देवी मंदिरातही मिळणार लाडू प्रसाद

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका देवी मंदिर (यल्लमा) येथेही आता तिरुपती बालाजी आणि शिर्डी साई मंदिराच्या धर्तीवर भक्तांना प्रसादासाठी लाडू उपलब्ध करून दिला जाणार आहे. मंदिर प्रशासनातर्फे यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यात्रेस विविध सणांना येथे देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यातील यात्रेवेळी डोंगरावर लाखोंची गर्दी अनुभवायला मिळते त्यामुळे येथे लाडू चा प्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सोंदत्ती तालुक्यात असलेले यल्लमा देवस्थान हे कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. विविध सणांना महिलांसह इतर भाविक भक्तिभावाने येथे यात्रा व दर्शनासाठी येत असतात. श्रावण व नवरात्रीमध्ये डोंगरावर भावीक लाखोंच्या संख्येने गर्दी करत असतात. ज्याप्रमाणे तिरुपती व शिर्डी येथे भक्तांना प्रसादाचे लाडू वितरण केले जाते, त्याप्रमाणे रेणुका देवी मंदिरमध्येसुद्धा अश

The post तिरुपती बालाजी प्रमाणे सौंदत्ती येथील रेणुका देवी मंदिरातही मिळणार लाडू प्रसाद appeared first on पुढारी.



from पुढारी https://ift.tt/cxSzq4W
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url