Kolhapur Crime : दिल्लीच्या व्यापाऱ्याची २६ लाखांची बॅग लंपास
कोल्हापूर : वळिवडे (गांधीनगर) रेल्वे स्टेशनवर तिकीट काढताना दिल्लीतील व्यापाऱ्याची २५ लाख ७६ हजार २५० रुपयांची बॅग अज्ञाताने लंपास केली. सचिन सुरेशकुमार अग्रवाल (वय ४७, रा. ओंकारनगर, दिल्ली) असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्यांनीच गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सचिन अग्रवाल यांचा शू ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. ते व्यापारानिमित्त गांधीनगर बाजारपेठेत आले होते. काम आटोपून ते वळीवडे (गांधीनगर) रेल्वे स्टेशनवर आले. ते तिकीट काढण्यासाठी रेल्वे तिकीट खिडकीजवळ गेले. तिकीट काढताना त्यांनी २५ लाख ७६ हजार २५० रुपयांची रक्कम असलेली काळी बॅग खाली ठेवली. त्याचा फायदा उठवत अज्ञाताने ती बॅग लंपास केली. अज्ञाताने काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट व चौकटा शर्ट घातला होता. याबाबतची फिर्याद अग्रवाल यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी अधिक तपास करीत आहेत.
from pudharinews https://ift.tt/X7qEJzo