Kolhapur News : टाकी आहे; पण पाणीच नाही!
फुलेवाडी : यात्रा, गणेशोत्सव व सार्वजनिक कार्यक्रमासाठी महापालिकेतर्फे फिरत्या शौचालयांची सुविधा उपलब्ध केली आहे; परंतु सध्या फिरत्या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. पाण्याची टाकी आहे, तरी त्यात पाणीच नाही आणि पाण्याचा नळ आहे; पण तोटीच नाही, अशी दुरवस्था या शौचालयांची झाली आहे.
गणेशोत्सव, जोतिबा यात्रा उत्सव तसेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमासाठी नागरिक व महिला यांची सुविधा करण्यासाठी महापालिका फिरत्या शौचालयांची व्यवस्था करते. शहरी परिसरात एखाद्या कार्यक्रमासाठी साधारणतः 700 रुपये, तर ग््राामीण भागासाठी 900 रुपये एक दिवसासाठी शौचालय फी आकारली जाते; परंतु त्या शौचालयात पाण्याची टाकी, शौचालयाची दारे आणि स्वच्छता असणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी लावलेल्या महापालिकेच्या फिरत्या शौचालयात या सुविधांचा अभाव आहे. काही दिवसांपूर्वी रंकाळ्याजवळ दुरवस्था झालेले फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या पंचगंगा नदी परिसरात अशीच पूर्णपणे दुरवस्था झालेले शौचालय लावण्यात आली आहेत. शौचालयाला जी पाण्याची टाकी जोडली आहे, त्यात एक थेंबदेखील पाणी नाही.
from pudharinews https://ift.tt/2gXYdOv