Cat microchip identification | हरवलेले मांजर मायक्रोचिपमुळे परत मिळाले

ऑस्टिन (टेक्सास) : जीवनात कधी काय घडेल याचा नेम नसतो. टेक्सासमध्ये एका कुटुंबासोबत असाच काहीसा चमत्कारिक प्रकार घडला आहे. पाच वर्षांपूर्वी घराबाहेर पडलेली आणि पुन्हा कधीही न परतलेली किटकेट नावाची मांजर तिच्या मालकांना सुखरूप परत मिळाली आहे. या विरहाचा अंत झाला तो एका लहानशा तंत्रज्ञानामुळे, ते म्हणजे मायक्रोचिप.

मार्च महिन्याच्या अखेरीस विल्यमसन काऊंटी प्रादेशिक प्राणी निवारा केंद्रात एक मांजर आणले गेले. नियमानुसार, निवारा केंद्राच्या कर्मचार्‍यांनी मांजराच्या अंगावर काही ओळख पटवण्यासाठी मायक्रोचिप आहे का, हे तपासले. स्कॅन केल्यावर कर्मचार्‍यांना धक्काच बसला. कारण, त्या चिपमध्ये पाच वर्षांपूर्वीची माहिती होती. मांजरीची मालकीण अँजेलिक वेथेरिट यांना जेव्हा निवारा केंद्राकडून ई-मेल आणि मेसेज आला, तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. ‘माझ्या पत्नीला ई-मेल आला आणि मला मेसेज. आम्ही तातडीने वेबसाईटवर जाऊन फोटो पाहिला आणि ती आमचीच किटकेट होती. मला अजूनही हा धक्काच वाटत आहे, हे स्वप्न असल्यासारखे वाटतेय,’ अशी भावना अँजेलिक यांनी व्यक्त केली.

निवारा केंद्रातील कर्मचारी लिओ डेलगाडो यांनी सांगितले की, ‘मी 2013 पासून या क्षेत्रात काम करत आहे; पण 5 वर्षांनंतर एखादा प्राणी त्याच्या मालकाला पुन्हा भेटल्याची ही पहिलीच घटना आहे. हे अविश्वसनीय आहे!’ विशेष म्हणजे, इतकी वर्षे बाहेर राहूनही किटकेटची प्रकृती उत्तम होती आणि ती आपल्या मालकिणीला पाहताच लगेच त्यांच्या कुशीत शिरली.



from pudharinews https://ift.tt/0l6XVOS
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url