Hyderabad drug party raid | हैदराबादेत पोलिसांचा ‘ड्रग पार्टी’वर छापा; टीडीपी खासदार, माजी आमदार ताब्यात

हैदराबाद; वृत्तसंस्था : हैदराबाद येथे ड्रग पार्टी सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) खासदार पुट्टा महेश कुमार आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) माजी आमदार पायलट रोहित रेड्डी यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीत या सर्वांच्या ड्रग चाचण्या पॉझिटिव्ह आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांना मोईनाबाद येथील एका फार्म हाऊसमध्ये ड्रग पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलिट अ‍ॅक्शन ग्रुप फॉर ड्रग लॉ एन्फोर्समेंट (ईगल) पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री छापा टाकला. छाप्यात रोहित रेड्डी, पुट्टा महेश कुमार, रितेश रेड्डी, दिल्लीतील रिअल इस्टेट व्यावसायिक नमित मिश्रा, कौशिक रवी आणि अर्जुन रेड्डी या सहा जणांची ड्रग चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. छाप्यादरम्यान दिल्लीतील रिअल इस्टेट व्यावसायिक नमित मिश्रा यांनी पोलिसांना पाहताच रितेश रेड्डी यांच्या परवानाधारक बंदुकीतून एक गोळी झाडल्याचा आरोप आहे.

रक्त नमुने तपासणीसाठी पाठवले

ड्रग चाचणी किटमध्ये सहा जणांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्वांचे रक्त नमुने फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहेत. पार्टीमध्ये सुमारे 11 जण उपस्थित होते. त्यात शर्वी रेड्डी नावाच्या एका महिलेचाही समावेश होता. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणांहून येथे आले होते. त्यांनी अलीकडेच गोवा येथे ड्रग्जचे सेवन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर ते शिमला आणि हैदराबादला आले होते.



from pudharinews https://ift.tt/lTjCXsr
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url