‌Sangli News : ‘पुढारी ॲग्रीपंढरी‌’ प्रदर्शन शुक्रवारपासून

सांगली : पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या ‌‘पुढारी ॲग्रीपंढरी‌’ या भव्य पीक प्रात्यक्षिक प्रदर्शनाला अवघे चार दिवस उरले असून, शुक्रवारी (दि. 20) प्रदर्शन शेतकऱ्यांना पाहण्यासाठी खुले होणार आहे. विलिंग्डन कॉलेज कंपाऊंडमधील छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या परिसरात भव्य मंडप उभारणी प्रगतिपथावर असून, बारामतीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्रदर्शन स्थळावर साकारलेल्या 75 पेक्षा जास्त फळभाज्या, पालेभाज्या, फुले अशा पिकांच्या लाईव्ह प्लॉटस्‌‍मधील जोमदार पिके शेतकऱ्यांची प्रतीक्षा करत आहेत. शेतात डौलणारे भरघोस पीक डोळ्यांचे पारणे फेडत आहे. 20 ते 23 फेबुवारी या कालावधीत सांगलीत भरणाऱ्या या प्रदर्शनातील पीक प्रात्यक्षिके पाहण्यासाठी शेतकरी, कृषी कंपन्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. दै. ‌‘पुढारी‌’ माध्यम समूह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‌‘ऑर्बिट क्रॉप न्यूट्रिएंट‌’ हे मुख्य प्रायोजक असून, ट्रॅव्हल पार्टनर ः अ हेवन हॉलिडेज आहेत. सहप्रायोजक कन्हैया ॲग््राो आणि चितळे डेअरी आहेत. गिफ्ट स्पॉन्सर सोन रूपम जेम्स ॲन्ड ज्वेलरी हे असणार आहेत. तसेच राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे.

दोन महिन्यांआधी मशागत पूर्ण झाल्यानंतर, अत्याधुनिक तंत्रज्ञान, पोषण मूल्यांचा संतुलित पोषण मूल्ये देऊन आधुनिक तंत्राचा वापर करून लावलेल्या पिकांची वाढ आता जोमदार झाली आहे. प्रदर्शनाच्या चार दिवसांत शेतकऱ्यांना ही पूर्ण वाढलेली पिके प्रत्यक्षात पाहता येतील. तसेच विक्रमी उत्पादनाचे रहस्यदेखील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उलगडणार आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भरघोस उत्पादनाचे तंत्रदेखील शिकता येणार आहे. बारामतीनंतर पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सांगलीत हे पीक प्रात्यक्षिक राबवले जात आहे. हजारो शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची ही सुवर्णसंधी आहे. या सोबतच औषध, बी-बियाणे शेती अवजारे यांचे स्टॉल्स बघायला मिळतील. आता केवळ मोजकेच स्टॉल शिल्लक राहिले असून, बुकिंगसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाळासाहेब : 9850556009

सांगली (प्रशांत) : 8805007148

कंझ्युमर स्टॉल बुकिंगसाठी :

सनी : 9922930180

अमर : 9545327545

फूड स्टॉल बुकिंगसाठी

दीपा ः 8805007724



from pudharinews https://ift.tt/fhEBiYm
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url