Jalna Accident : माल मोटरीचे टायर निखळून दुचाकीवर आदळले; माजी नगरसेवकाच्या मुलाचा जागीच मृत्यू

भोकरदन : धावत्या माल मोटारीचे चाक निखळून दुचाकीवर आदळ्याने झालेल्या विचित्र अपघातात माजी नगरसेवकांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२५) दुपारी १२ च्या सुमारास भोकरदन-जालना रस्त्यावरील सोयगाव देवी पाटीजवळ घडली. राजू दुधे असे मृत तरूणाचे नाव आहे.

सिल्लोड येथील माजी नगरसेवक बाबुराव दुधे यांचे चिरंजीव राजू दुधे हे बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान जालना रस्त्याने भोकरदनकडे जात होते. यादरम्यान सोयगाव देवी पाटीजवळ भरधाव माल मोटरीचे (आर जे ०२ जीसी ६०६१) चे चाक निखळून ते राजू दुधे यांच्या दुचाकीवर आदळले. या अपघातात गंभीर जखमी होऊन दुधे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात संबंधित माल मोटरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



from pudharinews https://ift.tt/DH5aVpJ
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url