कोल्हापूर : मौजे वडगावमध्ये होळी दिवशी परप्रांतीय तरूणाचा बुडून मृत्यू

डोक्‍यात रॉड मारून एकाची हत्‍या

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : मौजे वडगांव येथे मित्राकडे होळी खेळण्यासाठी आलेल्या परप्रांतीय तरूणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २५) दुपारी घडली. धर्मेंद्र तुरहा असे मयत तरुणाचे नाव आहे. शिरोली पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

पोलिसात मिळालेल्या माहितीनुसार मयत धर्मेद्र तुरहा ( वय 26 रा. मुळ उत्तरप्रदेश, सध्या रा. कबनुर इचलरंजी) हा इचलकरंजी येथून धुलीवंदन (रंगपंचमी) साजरी करणेसाठी मौजे वडगांव येथे आपल्या मित्राकडे आला होता. दरम्यान रंगपंचमी खेळून झाल्यानंतर मौजे वडगाव येथील शेतातील विहीरीच्या काठावर बसला असता पाय घसरुन पडला. या विहिरीत बुडुन त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर सोबत असलेल्या मित्रांनी आक्रोश केला. सोमवारी असलेल्या धुलीवंदनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परप्रांतीयांमध्ये शोककळा पसरली

The post कोल्हापूर : मौजे वडगावमध्ये होळी दिवशी परप्रांतीय तरूणाचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.



from पुढारी https://ift.tt/zEpgma2
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url