इलेक्टोरल बाँडमध्ये भाजप मालामाल; तब्बल ६ हजार कोटींवर निधी, पहा कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला

पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँडशी संबंधित माहिती सार्वजनिक केली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 12 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोगाला (ECI) निवडणूक रोख्यांशी संबंधित डेटा प्रदान केला होता. त्यानंतर गुरुवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर डेटा अपलोड करण्यात आला. SBI कडून प्राप्त झालेला इलेक्टोरल बाँड डेटा जसा आहे तसा वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे.

या निवडणूक रोख्यांमध्ये राजकीय पक्षांना किती निधी मिळाला याबाबत सविस्तर माहिती आहे. यामध्ये भाजप पक्ष आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि इतर काही पक्षांनाही निधी मिळाल्याचे निष्पन्न झाले आहे. भाजपला ६ हजार ६० कोटी ५१ लाख इतका निधी मिळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर काँग्रेसला १ हजार चारशे २१ कोटी ८६ लाख इतका निधी मिळाला असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर इतरही काही पक्षांनी ही निवडणूक रोखे घेतल्याची माहिती आहे.

राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्या

रक्कम रुपये पक्ष एकूण बॉण्डची संख्या
6060,51,11,000 भाजप 8633
1421,86,55,000 काँग्रेस 3146
65,45,00000 आम आदमी पार्टी 245
14,05,00000 समाजवादी पार्टी 46
6,05,00000 एआयडीएमके 38
1609,53,14,000 तृणमूल काँग्रेस 3305
1214,70,99,000 बीआरएस 1806
14,00,000,00 जनता दल युनायटेड 14
775,50,000,00 बिजू जनता दल 861
639,00,000,00 डीएमके 648
35,00000 गोवा फॉरवर्ड पार्टी 17
50,00000 नॅशनल कॉन्फरन्स 5
21,0000000 जनसेना पार्टी 39
43,50,00000 जनता दल सेक्युलर 75
13,50,00000 झारखंड मुक्ती मोर्चा 45
55,00000 महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी 28
31,0000000 राष्ट्रवादी 121
73,50,00000 राष्ट्रीय जनता दल 150
7,26,00000 शिरोमणी अकाली दल 33
158,38,14,000 शिवसेना 354
5,50,00000 सिक्कीम डेमोक्रॅटिक पार्टी 10
36,50,00000 सिक्कीम क्रांती मोर्चा 50
218,88,00000 तेलुगु देसम पार्टी 279
337,0000000 वायएसआर काँग्रेस 472

SBI electoral bonds. File

The post इलेक्टोरल बाँडमध्ये भाजप मालामाल; तब्बल ६ हजार कोटींवर निधी, पहा कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला appeared first on पुढारी.



from पुढारी https://ift.tt/tqlpuYh
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url