लातूरात छावाने संघटनेने मराठा अध्यादेशाची केली होळी

लातूर; पुढारी वृतसेवा : सरकारने मंगळवारी (दि. २०) काढलेल्या मराठा आरक्षण अध्यादेशावर आक्षेप घेत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय छावा संघटनेने त्या अद्यादेशाची होळी केली. गेल्या दोन वेळेस कोर्टात न टिकणारे आरक्षण देऊन मराठ्यांना फसवले असल्याचा आरोप यावेळी छावाने केला. अध्यादेशाची होळी करत सरकारचा निषेध व केला आहे तसेच यापुढे आणखी तीव्र आंदोलन होईल असा इशाराही यावेळी दिला. यावेळी छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, भगवान माकणे दीपक नरवडे मनोज फेसाटे मनोज लंगर, अंकुश शेळके शिवशंकर सूर्यवंशी केशव पाटील सुदर्शन ढमाले रमाकांत करहे श्रीधर धुमाळ कैलास सूर्यवंशी राहुल भोसले ऋषी खरोसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

The post लातूरात छावाने संघटनेने मराठा अध्यादेशाची केली होळी appeared first on पुढारी.



from पुढारी https://ift.tt/HxItpVN
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url