सिंहाच्या 'त्या' वादग्रस्त नाव ठेवल्याप्रकरणी आयएफस अधिकारी निलंबित; त्रिपुरा सरकारची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील प्राणिसंग्रहालयात सिंह आणि सिंहिणीच्या नावावरून निर्माण झालेल्या वादग्रस्त प्रकरणातील वनविभाग अधिकारी (IFS) प्रवीण एल अग्रवाल यांना त्रिपुरा सरकारने निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी ॲनिमल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत सिंह आणि सिंहिणीला त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणीसंग्रहालयातून सिलीगुडीच्या ‘नॉर्थ बंगाल वाइल्ड ॲनिमल पार्क’मध्ये पाठवण्यात आले होते. प्रवीण लाल अग्रवाल, 1994 बॅचचे IFS अधिकारी, तेव्हा त्रिपुराचे मुख्य वन्यजीव वॉर्डन म्हणून कार्यरत होते. या सिंहाच्या नर आणि मादीला सिलीगुडीला पाठवताना त्यांनी डिस्पॅच रजिस्टरमध्ये अकबर आणि सीता अशी नावे नोंदवली होती. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. कोलकाता उच्च न्यायालयात या प्रकरणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली.
कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सिंह आणि सिंहिणीची नावे बदलण्याचे आदेश दिले. सिंहाचे नाव ‘अकबर’ आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ ठेवल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. यावर विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
The post सिंहाच्या 'त्या' वादग्रस्त नाव ठेवल्याप्रकरणी आयएफस अधिकारी निलंबित; त्रिपुरा सरकारची कारवाई appeared first on पुढारी.
from पुढारी https://ift.tt/LE3BltG